मुंबईला लखनौच्या सामन्यापूर्वी बसला मोठा धक्का

सामना सुरु होण्यापूर्वीच आता मुंबई (Mumbai) इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. रविवारी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी मुंबईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे आणि त्यामुळेच आता हार्दिक पंड्याची चिंता वाढेलली आहे.

मुंबईचा संघ सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. मुंबईच्या संघाने सलग चार विजय मिळवले असून ते चांगल्या लयीत आले आहेत. चार विजय मिळवल्यामुळे अजूनही मुंबई इंडियन्सचे आव्हा जीवंत आहे. पण आता या लखनौच्या सामन्यापूर्वी मात्र मुंबईच्या संघाला आता मोठा धक्का बसला असल्याचे समोर आले आहे.

मुंबई (Mumbai) इंडियन्सने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. या ९ सामन्यांपैकी मुंबईच्या संघाने पाच लढती जिंकल्या होत्या, तर चार मॅचेसमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मुंबईने पाच विजय मिळवले आहेत. त्यामुळे पाच विजयांसह मुंबईच्या खात्यात १० गुण आहेत. या १० गुणांसह मुंबईचा संघ हा पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर होता. पहिले चार संघ हे प्ले ऑफमध्ये पोहोचतात. त्यामुळे मुंबईच्या संघाला हायसे वाटले होते. पण आता मुंबईच्या संघाला धक्का बसला आहे. केकेआर आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात पाऊस पडला. पावसाचा जोर एवढा जास्त होता की, हा सामान रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे केकेआर आणि पंजाब या दोन्ही संघांना समान एक गुण देण्यात आला. या सामन्यापूर्वी केकेआरचे सहा गुण होते, तर पंजाबचे १० गुण होते. पण या सामन्यानंतर दोघांना प्रत्येकी एक गुण मिळाले. त्यानंतर आता केकेआरचे सात गुण झाले आहेत, तर पंजाबचे ११ गुण झाले आहेत. त्यामुळे पंजाबने आता ११ गुणांसह मुंबई इंडियन्सला धक्का देत पॉइंट्स टेबलमध्ये चौथे स्थान पटकावले आहे आणि मुंबईची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे आता मुंबईने जर लखनौला रविवारी पराभूत करता आले नाही तर त्यांना चौथ्या स्थानावर जाता येणार नाही आणि त्यांची गुणतालिकेत घसरण होऊ शकते, त्यामुळे लखनौच्या सामन्यापूर्वी आता हार्दिकची चिंता वाढलेली असेल.

मुंबईला लखनौचा सामना सुरु होण्यापूर्वी आता मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा रविवारी पराभव झाला तर त्यांच्यार मोठी नामुष्कीची वेळ येऊ शकते. त्यामुळे रविवारी मुंबईचा संघ विजय मिळवतो की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.