Food Poisoning : 10 विद्यार्थ्यांना विषबाधा…..

अकोला मनपा शाळेतील गंभीर आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पोषण आहाराच्या खिचडीमध्ये मेलेल्या उंदराचे अवशेष सापडले. यामुळे त्यांना विषबाधा झाली आहे. मृत उंदराचे अवशेष आढळलली खिचडी खाल्लेल्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 10 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मनपा शाळेत पोषण आहारत खिचडी दिली जाते.

खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, शालेय पोषण आहारात मंगळवारी दुपारी विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या खिचडीमध्ये मृत उंदराचे अवशेष सापडले आहेत. हीच खिचडी या विद्यार्थ्यांनी सेवन केली होती, ज्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्यावर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.