मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ….

टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आता मैदानात कमबॅक करत आहे. वन डे वर्ल्ड कपमधील दुखापतीनंतर प्रथमच पंड्या मैदानावर दिसला. पंड्या क्रिकेटच्या मैदानापासून लांब असला तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेला पाहायला मिळतो.हार्दिक आगामी आयपीएलआधी मैदानात उतरल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे.

आयपीएलसाठी आपण फिट दाखवण्यासाठी पंड्या आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या डी. व्हाय. पाटील टूर्नामेंटमध्ये रिलायन्स संघाकडून खेळत आहे.गडी मैदानात उतरला पण नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे. हार्दिकने मैदानात उतरल्या उतरल्या बीसीसीआयचा एक नियम मोडला आहे. ही नियम म्हणजे बीसीसीआय कोणत्याही खेळाडूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये बीसीसीआयचा लोगो वापरण्याची परवानगी देत नाही.हार्दिक पंड्याने डी. व्हाय. पाटील टूर्नामेंटमध्ये आपल्या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो लावला होता.

आपल्या एक्स (ट्विट) हँडलवर पंड्याने फोटो शेअर केले आहेत.दरम्यान, बीसीसीआयने निवडलेल्या संघात खेळण्याची संधी मिळते. तुम्ही कोणत्याही अंडर 19 देशांतर्गत स्पर्धा, रणजी, सय्यद मुश्ताक किंवा इतर कोठेही बीसीसीआयचा लोगो असलेले हेल्मेट वापरू शकत नाही. पंड्याने फोटोही टाकलेत त्यामुळे त्याच्यावर कारवाई होते की नाही हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.