निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता ऐन उन्हाळ्यातच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.महायुती व महाविकास आघाडीकडून अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.दुसरीकडे काही जागांवरून महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षात रस्सीखेच सुरू आहे.

दरम्यान याच काळात वेगवेगळ्या माध्यम संस्थांकडून निवडणुकांच्या एक्झिट पोल आणि ओपिनिअन पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 लक्षात घेता 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत एक्झिट पोलवर बंदी असेल.

आदेशानुसार, भारत निवडणूक आयोगाने 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. या कालावधीत सर्व लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलच्या निकालांचे प्रकाशन आणि प्रसारण करण्यास मनाई असेल.