आयपीएल स्पर्धेत प्लेऑफची शर्यत खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे. प्रत्येक सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेवर फरक पडताना दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 29 धावांनी पराभूत केलं. यामुळे दोन गुणांची कमाई तर झाली वरून नेट रनरेटही सुधारला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने नेट रनरेट खराब झाला होता. अखेल दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात यात सुधारणा करता आली.
मुंबई इंडियन्सने दोन गुण आणि -0.704 नेट रनरेटसह आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना धोबीपछाड दिला आहे. बंगळुरु आणि दिल्लीच्या पारड्यात दोन गुण आहेत. पण मुंबईच्या तुलनेत त्यांचा नेट रनरेट खूपच खराब आहे. त्यामुळे आरसीबीचा संघ नवव्या आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ दहाव्या स्थानावर आहे.