गावोगावी नेतेमंडळींची धामधूम सुरु झालेली पहायला मिळत आहे. प्रचार, सभा, मेळावे सुरु आहेत जेणेकरून आपणाला जास्तीत जास्त मते मिळवीत. वाळवा तालुक्यात नुकतीच खा. धैर्यशील माने यांची प्रचार सभा पार पडली.
येडेमच्छिंद्र ही क्रांतीची भूमी आहे. इथे दिलेला प्रत्येक शब्द हे माझे वचन असून, भविष्यकाळात तालुक्यातील प्रत्येक भागात विकासकामे पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.वाळवा तालुक्याने मताधिक्य देण्याचे आवाहन खा. धैर्यशील माने यांनी केले.
वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह पाटील व्यासपीठावरून ते प्रचार सभेत बोलत होते. प्रचार सभेपूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.