शनिवारी आणि रविवारी होणार पुरुष व महिलांच्या मानधन कुस्ती स्पर्धा (मॅटवरील) २०२५

वाळवा तालुका व परिसरातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी मा. प्रतीकदादा जयंत पाटील अध्यक्ष राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजारामनगर यांच्या संकल्पनेतून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना आयोजित पुरुष व महिलांच्या मानधन कुस्ती स्पर्धा मॅटवरील 2025 होणार आहेत.शनिवारी म्हणजेच 25 जानेवारी व 26 जानेवारी या कालावधीमध्ये या स्पर्धा होणार आहेत. पैलवानांची नाव नोंदणी शनिवार दि.२५/०१/२०२४ रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत घेऊन वजने घेतली जातील.

पुरुष कुस्ती गट
14 वर्षे वयोगट
40 किलो, 45 किलो, 50 किलो
१७ वर्षे वयोगट
55 किलो, ६० किलो

ओपन गट
65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 8६ किलो, 92 किलो
120 किलो ओपन

महिला कुस्ती गट

14 वर्षे वयोगट
35 किलो, 40 किलो, 45 किलो
17 वर्षे वयोगट
50 किलो, 55 किलो

ओपन गट
61 किलो, 65 किलो, 72 किलो, 76 किलो

प्रत्येक वजन गटातील विजेत्यांना पहिल्या तीन क्रमांकास आकर्षक रोख बक्षीस दिले जाणार आहे कुस्त्यांच्या प्रेक्षणीय लढती पाहण्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या स्पर्धा शनिवारी 25 जानेवारीला दुपारी तीन वाजता राजारामबापू कुस्ती केंद्र राजारामनगर येथे होणार आहेत.