भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदची पाकिस्तानात हत्या..

पाकिस्तानात मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या हत्यांचं सत्र सुरूच आहे. मागील काही दिवसांपूर्वी भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची हत्या झाली होती. यात पठाणकोट हल्ल्यामागील मास्टर माईंड शाहिद लतीफ होता. तर दुसरा दहशतवादी आयएसआयचा एजंट मुल्ला बाहौर उर्फ होर्मुज हा होता. या हा दोघांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली होती. 

आता ज्या दहशतवाद्याची हत्या झाल्याची बातमी हाती आली आहे, त्याचं नाव आहे दाऊद मलिक. हा जागतिक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा खास व्यक्ती होता. जैश-ए-मोहम्मदसह दाऊद मलिक हा लश्कर-ए-जब्बर आणि लश्कर-आय-जांगवी या संघटनेशी जुडलेला होता. मसूद अजहर, हाफिज सईद, लखवी आणि दाऊद इब्राहिमसह युएपीएयसह भारत सरकारने त्याला दहशतावादी घोषित केलं होतं.

बालाकोटच्या एअर स्ट्राईकमध्ये बचावला होता मलिक

दाऊद मलिकची हत्या पाकिस्तानच्या वजीरीस्तानमध्ये करण्यात आली. येथे अज्ञात लोकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी पाकिस्तानमध्ये असलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. दरम्यान भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना अशा पद्धतीने टार्गेट करत त्यांचा खात्मा करण्याचं काम पाकिस्तानातच नाही तर जगातील इतर देशांमध्येही सुरू आहे.

पुलवामा हल्ला झाल्यानंतर जेव्हा भारतीय सेने बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. त्यावेळी तेथे दाऊद मलिक उपस्थित होता असं सांगण्यात येत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्या बालाकोटमधील हल्ल्यातून दाऊद बचावला होता. सर्व दहशतवादी आयएसआयच्या छत्रछायेखाली राहतात. परंतु पाकिस्तान या दहशतवाद्यांचं संरक्षण करत असते. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीपूर्वी पाकिस्तानने मौलाना मसूद अझहर अफगाणिस्तानात असल्याचे सांगितले होते. त्याच्या अटकेसाठी अफगाणिस्तानला पत्र लिहिलं होतं.