महाराष्ट्रासाठी मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी!

राज्यात आणि देशात सध्या तापमान प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्वांना मान्सूनचे वेध लागले आहे. यंदा मान्सूनची वाटचाल चांगली सुरु आहे. अंदमान निकोबारमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला. १८ मे रोजी अंदामान निकोबारमध्ये मान्सून आल्यानंतर त्याची वाटचाल केरळकडे सुरु झाली.

केरळमध्ये मान्सून वेळेआधी आला. १ जून ऐवजी ३० मे रोजी मान्सून आला. त्यानंतर महाराष्ट्रतील कोकणात मान्सूनचे वेध लागले. महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आहे. मान्सून कोकणात वेळेआधीच दाखल होणार आहे. कोणात मान्सून वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.कोकण किनारपट्टीवरती मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. येत्या 3 जूनला गोव्यात तर 4 जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज आहे.

दोन जूनपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार आहे. यंदा मान्सून वेळेआधीच येणार आहे. तसेच सरासरीपेक्षा जास्त कोसळणार आहे. राज्यात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला आहे.अरबी समुद्र खवळलेला असल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग ही वाढला आहे.

आता समुद्राचा रंग देखील बदलला आहे. समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहे. तळकोकणातून महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होते. त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.