लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला. महाराष्ट्रातील ११ लोकसभा जागांवर ७ मे रोजी मतदान होणार आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचारसभांचा धडाका लावत होते. त्याचवेळी त्यांच्या पक्षातील बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत होता. अखेरी रविवारी मध्यरात्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाला. नाशिक मधील ठाकरे गटाचे निष्ठावंत विजय करंजकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. यामुळे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसला आहे. विजय करंजकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री तीनच्या सुमारास मुंबईतील बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी दादा भुसे देखील उपस्थित होते.
Related Posts
Baba Ramdev : पतंजलीच्या ‘या’ उत्पादनामध्ये मांसाहारी घटक वापरल्याचा दावा, कोर्टात याचिका दाखल
योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीकडून विविध आयुर्वेदीक उत्पादनांची निर्मिती केली जाते. आता पतंजलीच्या एका उत्पादनाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका…
हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) सावत्र भावाला फसवणूक केल्यामुळे मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव पांड्या असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं…
आघाडीकडून डावपेचांना सुरुवात, निकालाआधीच फोनाफोनी, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात लागले कामाला!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागायच्या आधीच महाविकास आघाडीने संभाव्य राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन सत्तास्थापनेच्या दृष्टीने चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.…