लोकसभा निवडणूक २०२४ ची मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली. त्यानंतर आता उद्या मंगळवारी ४ जून रोजी निवडणूक निकाल येणार आहेत. देशात सर्वच ठिकाणी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातही मतमोजणी होणार आहे. ‘एग्झिट पोल’मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी सरकार बनणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे निवडणूक निकाल ‘एग्झिट पोल’सारखे येतात की दुसरे काही याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत मुख्य लढत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीत आहे. दिल्लीत एनडीएच्या नेत्यांनी मंजूर केलेल्या ठरावात एनडीएच्या नेत्यांनी एकमताने नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड केली.