उद्यापासून लालपरी थांबणार? प्रवाशांचे होणार हाल! वाचा सविस्तर…..

एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एसटी महामंडळातील अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत ३ सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य मागण्यांबाबत शासन दरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

७ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोनही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासकीय व प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी व संयुक्त कृती समितीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगनू या मागण्यांवर येणारा वित्तीय भार आणि त्याची कशाप्रकारे सांगड घालावयाची यासंदर्भात उच्च अधिकार समितीसोबत आठवड्याभरात बैठक घेऊन सदरचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी सदर बैठकीत दिले.