गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड जहीर इकबाल येत्या २३ जून रोजी लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटले जात होते.सोनाक्षीने या लग्नाच्या अफवा असल्याचेही सांगितले होते. आता अशातच सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता हे कपल लग्न करणार असल्याचं सिद्ध झाले आहे.
गेल्या अनेक काळापासून सोनाक्षी आणि जहीर एकमेकांना डेट करीत आहे. पण तरी सुद्धा हे कपल लग्नाची तारीख आपल्या चाहत्यांपासून लपवत होते. पण अशातच आता सोनाक्षी आणि जहीर यांचं वेडिंग कार्ड समोर आलं आहे. वेडिंग कार्डप्रमाणे, सोनाक्षी आणि जहीर येत्या २३ जूनलाच लग्नगाठ बांधणार आहे.
या लग्नसोहळ्याला सोनाक्षी आणि जहीरचे जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळी उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील बास्टियन रेस्टॉरंटमध्ये सोनाक्षी आणि जहीरचं लग्न पार पडणार आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून सोनाक्षी लग्नाची तयारी करत होती. अभिनेत्रीने तिचे लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नामध्ये पाहुण्यांना ड्रेस कोडही असणार आहे. लग्नामध्ये पाहुण्यांनी लाल रंगाचे कपडे परिधान करु नयेत, असं पत्रिकेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
सोनाक्षी आणि जहीर २३ जून रोजी सकाळी रजिस्टर मॅरेज करणार आहेत. तर संध्याकाळी नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या सोशल मीडियावर हे वेडिंग कार्ड व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये लग्नाची जोरदार चर्चा होत आहे.