‘भूलभुलैया 3’ मध्ये विद्या बालनसह दिसणार धक् धक् गर्ल!

हॉरर कॉमेडीपट असलेल्या ‘भुलभूलैया ‘ चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.  ‘भुलभूलैया ‘ चित्रपटाच्या सीरिजचा आता तिसरा भाग येणार आहे.  ‘भुलभूलैया -3’ हा चित्रपटात कार्तिक आर्यन आणि विद्या बालन देखील असणार आहेत. त्याहून मोठं सरप्राइज म्हणजे या चित्रपटात ‘धक् धक् गर्ल’  माधुरी दीक्षितदेखील असणार असल्याचे वृत्त आहे.  आधीच्या दोन्ही भागांप्रमाणे आता ‘भुलभूलैया -3’ देखील बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 

दिग्दर्शक अनीस बज्मी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि कार्तिक आर्यन यांच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटात माधुरी दीक्षित ही भूताची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. ‘मिड-डे’ या वृत्तसंस्थेला सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील कथानकाला एक खास वेगळं देण्यासाठी माधुरीची निवड करण्यात आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात रूह बाबा विरुद्ध माधुरी दीक्षित आणि विद्या बालन साकारत असलेल्या भूतांचा सामना होणार आहे. दोन्ही दिग्गज अभिनेत्रींना एकत्र आणत दिग्दर्शकाने आता हुकूमाचा एक्का काढला असल्याचे म्हटले जात आहे.  ‘भुलभूलैया -3’ मध्ये रुह बाबा साकारणाऱ्या कार्तिक आर्यनसोबत सारा अली खान झळकणार आहे.