शेअर बाजारात लोकांची गुंतवणूक सतत वाढत आहे. अलीकडच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की शेअर बाजारात नवीन गुंतवणूकदार दाखल होत आहेत. एकीकडे शेअर बाजारात चांगला परतावा मिळतो, तर दुसरीकडे त्यात जोखीमही असते. त्यामुळे कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यापूर्वी त्या कंपनीबद्दल आणि तिची कार्यपद्धती याबद्दल योग्य रिसर्च करायला हवा.
जेणेकरून कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे आणि भविष्यात ती किती ग्रोथ करू शकते हे समजू शकेल. येथे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या शेअर खरेदी करण्यापूर्वी तुम्ही चेक केल्या पाहिजेत.
1. कंपनीचे मॅनेजमेंट
कंपनीचे मॅनेजनेंट कसे आहे? त्यांच्याकडे किती अनुभव आहे आणि ती ग्रोथ करण्यासाठी कोणती रणनीती वापरते? हे काही पैलू आहेत ज्यांच्या आधारे कंपनीची भविष्यातील कामगिरी ठरवली जाईल. एक मजबूत मॅनेजमेंट टीम कंपनीला योग्य यशाच्या दिशेने नेऊ शकते.
2. कंपनीचे तिमाही निकाल
कंपनी दर तिमाहीत आपले निकाल जाहीर करते. याद्वारे तुम्ही त्यांच्या आर्थिक स्थितीचे आकलन करू शकता. तुम्ही कंपनीची कमाई, बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट चेक करुन तिच्या आरोग्याचे मूल्यांकन करू शकता. याद्वारे तुम्हाला कंपनीवर किती कर्ज आणि रोख रक्कम आहे हे कळू शकेल.
3. कंपनी कोणत्या उद्योगात आहे?
कंपनी कोणत्या उद्योगात आहे? उद्योगात वाढ होण्याची शक्यता आहे का? उद्योगाच्या स्थितीचे मूल्यमापन केल्याने तुम्हाला कंपनीचे भविष्य कसे दिसते हे समजण्यास मदत होईल.
4. कंपनीच्या शेअर्सची किंमत
कंपनीच्या शेअरची किंमत त्याचे मूल्य दर्शवते. रास्त भावाने शेअर्स खरेदी करणे महत्त्वाचे आहे. काही वेळा कंपनीचे शेअर्स जास्त ओवर वॅल्यू असतात.