सध्या इंस्टाग्रामवरील अनेक रील्स चांगलेच व्हायरल होत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असणारा आणि इंस्टाग्रामवर फेमस असणारा कॉमेडी बाळू आण्णा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या रांगडी भाषांचा छंद जोपासत त्याने कोल्हापूरची ही भाषा विनोदाच्या माध्यमातून आणि कौटुंबिक विनोद करत जगभर पोहचवल्या आहेत.
जनतेच्या भावनेलाच हात घालून थोडीफार करमणूक करत नेटकऱ्यांना हसवण्याचे काम कॉमेडी आण्णा आपल्या रोजच्या रील्समधून करीत असतो. महायुती सरकारनं लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) ही योजना जाहीर करून महिलांच्या खात्यावर प्रति महिना दीड हजार देण्याची घोषणा केली आहे. यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे.
कोल्हापूरच्या कॉमेडी बाळू अण्णा रीलच्या माध्यमातून सरकारकडे (Eknath Shinde) मजेदार मागणी केली आहे.सध्या या कॉमेडी आण्णाच्या मागणीला सोशल मीडियावर चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. इंस्टाग्रामवर त्यांचा रील्स तुफान व्हायरल झाला आहे.
त्याने सरकारवर टीका करण्यासाठी हा व्हिडिओ केला नसून केवळ मनोरंजनासाठी हा व्हिडिओ केला असल्याचाही सांगत लाडक्या भावाचं काय? लाडक्या बहिणीसोबत लाडक्या जावई आणि दाजीचं पण काय तर बघा? असं आवाहन सरकारकडे केले आहे.