मार्च 2018 मध्ये कोल्हापुरातील करवीर तालुक्यात हा गुन्हा घडला होता. सचिन परशुराम पवते (वय 27, रा. परिते, ता. करवीर) असे त्या नराधमाचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी त्याला झालेल्या सुनावणीत दोषी ठरवले. दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
पाहुण्यांच्या घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार
पीडित अल्पवयीन मुलगी अकरावीच्या वर्गात शिकत होती. 15 मार्च 2018 रोजी महाविद्यालयात निघालेल्या पीडित मुलीचे आरोपी सचिनने अपहरण केले होते. यानंतर नराधम आरोपीने पाहुण्यांच्या घरी नेत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर पीडित मुलगी घरी न आल्याने ती बेपत्ता असल्याची फिर्याद तिच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.
पोलिसांकडून शोध सुरु असतानाच 3 एप्रिल 2018 रोजी पीडिता स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाली. आईने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी सचिनवर गुन्हा दाखल आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी न्यायालयात नऊ साक्षीदार तपासले. फिर्यादी आणि पीडित मुलीची साक्ष, तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावली.