विश्वविजेता रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैयस्वाल यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आज वर्षा निवसस्थानी रोहित शर्मा आणि इतर खेळाडू आले होते. त्यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे या प्रसंगाचे लाईव्ह प्रेक्षपण केले. आज दुपारी रोहित शर्मा महाराष्ट्रातील खेळाडूंसोबत आज वर्षा निवस्थानवर पोहचला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केले.
त्यावेळी दोघांमध्ये मराठीमधून गप्पाही झाल्या. विश्वचषकातील प्रसांगावर दीर्घ चर्चा झाली. पारस भांब्रेही यावेळी त्यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावर झालेल्या या कार्यक्रमात प्रताप सरनाईकही उपस्थित होते. विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी गुरुवारी मुंबईमध्ये लाखोंचा जनसागर उसळला होता. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विश्वविजेत्यांची ओपन डेक बसमधून ऱॅली काढण्यात आली होती.
त्यावेळी चाहत्यांचा जनसागर रस्त्यावर उतरला होता. कधीही न थांबणारी मुंबई जगज्जेत्यासाठी रस्त्यावर उतरली होती. आज संध्याकाळी 4 वाजता विधानभवन येथे सेंट्रल हॉल येथे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ही रक्कम शुक्रवारी जाहीर करणार आहेत.