आता दारु पिऊन वाहन चालवलं तर लायसन्स रद्द होणार 

राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांची मालिका सुरुच आहे. त्यात अनेकांच्या प्रिय व्यक्तींना गमविण्याची वेळ आली आहे. बड्या धेंडांना वाचविण्यासाठी प्रशासनाची तत्परता पण दिसून आली आहे. देशभरातून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत असल्याने अखेर राज्याच्या सांस्कृतिक राजधानी, पुण्यात पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तळीरामांची तंद्री उडणार आहे. या शहरात दारु पिऊन वाहन चालविता येणार नाही. काय आहे हा निर्णय, त्यात काय होणार कारवाई जाणून घेऊयात.