मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबरोबरच महाराष्ट्र सरकारने ‘लाडका भाऊ योजना’ अर्थात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ लागू केली आहे.या योजनेतंर्गत सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार असून, या काळात विद्यावेतनही दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
कोणाला करता येणार अर्ज?
12वी उत्तीर्ण, आयआयटी प्रमाणपत्र धारक, पदविका धारक, पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. राज्यातील नामांकित उद्योगांमध्ये या तरुणांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार 18 ते 35 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे.
ही’ कागदपत्रे हवीच-
अर्जदाराची शैक्षणिक पात्रता 12 वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी असावा.- शिक्षण घेत असलेल्या तरुणांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. ते अपात्र ठरतील.
अर्जदाराचे रहिवाशी प्रमाणपत्र.
आधार कार्ड
बँक खाते आधार कार्डशी सलग्नित असावे.
अर्जदाराकडे कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे.
याचबरोबर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो आदी आवश्यक आहे.