पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शहर परिसरात झिका व्हायरसच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शहरात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. पश्चिम महाराष्ट्रात झिका व्हायरसचा वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. झिका व्हायरसचे रुग्ण आढळलेल्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.
झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे रूग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे.पश्चिम महाराष्ट्रात झिका व्हायरसचा वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये देखील झिका व्हायरसचे रूग्ण आढळले आहेत. झिका व्हायरसचा जास्त प्रमाणात धोका गर्भवती स्त्रियांना आहे. मुदतपूर्व प्रसूतीची देखील शक्यता वर्तविली जात आहे.