महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरमध्ये होईल व 26 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले.केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या.जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत; तर हरियाणात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.
या निवडणुकांचे निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. यासोबतच महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका नंतर होणार असल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. महाराष्ट्रात पुरामुळे मतदान अधिकार्यांना त्यांचे काम पूर्ण करता आलेले नाही. हेदेखील त्यामागील कारण आहे, असे स्पष्ट करतानाच महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक एकाचवेळी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.