Vidhan Sabha Election 2024: आज विधानसभेच्या रिंगणातील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत होणार बंद!

 राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीचे आज (बुधवारी) मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विरोधी महाआघाडी महाविकास आघाडी (MVA) ला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या उमेदवारांसाठी राज्यात प्रचार केला होता. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागलं आहे. दरम्यान राज्यातील काही महत्वपूर्ण लढती आहेत, त्या मतदारसंघामध्ये प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.