सांगोला तालुक्यातून पुन्हा एकदा डाळिंबाचे कोठार म्हणून डाळिंब हे पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित होत आहे. सध्या डाळिंब बाजारपेठेमध्ये आवक वाढलेली असून डाळिंबाला चांगलाच भाव मिळत आहे. दरम्यान सांगोला डाळिंब मार्केट मधून 173 रुपये प्रति किलो प्रमाणे उच्चांकि दर मिळालेला असून डाळिंब खरेदी विक्रीतून सांगोला डाळिंब मार्केटमध्ये दैनंदिन 15 ते 20 लाख रुपयांची उलाढाल सध्या होत आहे.
तरी शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंब विक्रीसाठी सांगोला मार्केटमध्ये येऊन घेऊन यावे असे आवाहन सभापती समाधान पाटील यांनी केलेले आहे.