कै. बाईसाहेब झपके यांच्या स्मृतीदिनानिमित्त मोफत कर्करोग तपासणी शिबिर संपन्न

सांगोला नगरीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला माजी अध्यक्षा कै. शोभनतारा उर्फ बाईसाहेब चंद्रशेखर झपके यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने व लुपीन लिमिटेड व निरामय हेल्थ यांच्या सहकार्याने सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिरामध्ये थर्मल स्क्रीनिंगद्वारे ४६ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली.

या शिबिराला सांगोला लायन्स क्लबचे संचालक डॉ. शैलेश डोंबे, डॉ. सौ. जीवनमुक्ती डोंबे व कॅन्सर संशोधक, व्याख्याते प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी भेट दिली व आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. शिबिराची सुरुवातीला सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष कै. गुरूवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास लुपीन लिमिटेडचे मॅनेजर विनायक गायकवाड व निरामय हेल्थच्या तंत्रज्ञ अपर्णा जिनवाल यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच माधुरी पैलवान व संध्या तेली यांचे हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक माजी प्रांतपाल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर, सचिव अजिंक्य झपके, खजिनदार नरेंद्र होनराव, लायन्स झोन चेअरमन प्रा. धनाजी चव्हाण, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार यांचेसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व लायन्स क्लब ऑफ सांगोला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.