राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांपासून संप सुरु होता. मात्र, आता हा संप मागे घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या ते पाहूया.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दि.1 एप्रिल, 2020 पासून सरसकट मुळ वेतनात 6500 रुपये वाढ करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे.
जुलै २०१6ते जानेवारी २०२0 या काळातील प्रलंबित महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करणार आहे.वेतनवाढीच्या 2100 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम कामगारांना लवकरच मिळणार.
वैद्यकीय सेवेतील कॅशलेस योजना कामगारांना लागू होणार होणार आहे.कर्मचारी आणि कुटुंबीयांना एसटीत फरक न करता 1 वर्षाची मोफत पास सवलत मिळणार आणि आंदोलनातील कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई होणार नाही, या मागण्या मान्य मान्य करण्यात आल्या आहेत.