खानापूर घाटमाथ्यावर द्राक्ष छाटणीस सुरुवात

खानापूर घाटमाथ्यावर द्राक्ष छाटणीस सुरुवात झाली आहे. पावसाचे वातावरण असूनही सुलतानगादे परिसरातील बागायतदारांनी धाडसाने सप्टेंबर महिन्यातच द्राक्ष बागांच्या छाटण्या घेण्यास सुरुवात केली आहे. खानापूर घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम द्राक्ष बागा तयार केल्या जातात. त्यामुळे द्राक्ष बागेसाठी पोषक व स्वच्छ वातावरण असणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये बागांची छाटणी घेतली जाते. मात्र, काही द्राक्ष बागायतदार देशांतर्गत द्राक्षमाल तयार करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या आधीच द्राक्ष बागा छाटणी घेतात. ज्यामुळे द्राक्ष लवकर तयार होऊन द्राक्षाला चांगला भाव मिळतो. यावर्षी उन्हाळ्यात चांगली द्राक्ष काडी तयार झाली आहे.