आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्ष सभा, मेळावे आयोजित करत आहेत. इस्लामपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते डॉ. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर विधानसभा आढावा बैठक विजया सांस्कृतिक भवन येथे पार पडली. यावेळी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे तशी परिस्थिती ही महायुतीत नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे तिघेही चांगल्या पद्धतीने समन्वयाने काम करत आहेत. आगामी निवडणुकांसाठी कोणती जागा कोण लढवणार हे नेते बसून ठरवणार आहेत. पक्ष संघटनेत चांगले काम करतात व जो निवडून येऊ शकतो त्याला शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी केली.
इस्लामपूर मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून तब्बल वीस हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळालेला आहे. महायुतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी काय गणित? कशाप्रकारे जिंकू शकतो?याचा आढावा घेतला गेला.
धैर्यशील माने यांना इस्लामपूर मतदारसंघात चांगली मते पडली आहेत. विरोधकांना वाटत होते फार मोठे मताधिक्य मिळेल ते लीड फक्त 17 हजारावर आले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणखी चांगले प्रदर्शन महायुती करेल असा विश्वास खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.