इस्लामपूर शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षांपूर्वी नाव समाविष्ट असलेली शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक निकष ग्राह्य धरला जाणार आहे.मुदतवाढ दिल्याने ३१ ऑगस्टपर्यंत महिला भगिनींना राहुल महाडिक अर्ज करता येणार आहेत.या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी केले.महाडिक म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यातील महिला भगिनींच्या सन्मानार्थ ही योजना आणली आहे.
या निर्णयाबद्द राज्य सरकारचे अभिनंदन करत आहोत.या योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा करून काही शिथिल करण्यात आल्या आहेत. या योजनेनुसार महिलांना दरमहा १ हजार ५०० रूपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. २१ ते ६५ वयापर्यंत ही योजना लागू आहे. १५ या योजनेतून पाच एकर शेतीची झाला अट काढून टाकली आहे. परराज्यात जन्म झालेल्या मात्र महाराष्ट्रातील नागरिकांसोबत विवाह असल्यास त्यांना पतीच्या जन्माचा दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य असेल. पिवळी व केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची सूट देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत कुटुंबातील एका अविवाहित मुलीलाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी व मुदतीसाठी महाडिक जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी केले आहे.