१०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून मिळाला आटपाडीला बहुमान

राज्यात १०० टक्के तंबाखूमुक्त शाळा असणारा तालुका म्हणून आटपाडीला बहुमान मिळाला आहे. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते तालुक्यातील २५० शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सलाम मुंबई फाउंडेशनमार्फत प्रमाणपत्रे देण्यात आली. प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड म्हणाले, आटपाडी तालुक्याचा आदर्श अन्य तालुक्यांतील शाळांनीही घ्यावा. दि. ४ फेब्रुवारी या कर्करोग दिनापर्यंत सर्व तालुके तंबाखूमुक्त होण्यासाठी मोहीम राबविणार आहोत.