दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इशान किशनची चालली जादू..

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात इंडिया सी आणि इंडिया बी या संघात सामना सुरु आहे. इंडिया बी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला. पण जेव्हा संघ जाहीर झाला तेव्हा या संघात इशान किशनचं नाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण दुसऱ्या टप्प्यातील सामन्यापूर्वी इशान किशनचं नाव कुठेही नव्हतं. त्यामुळे त्याची अचानक झालेली एन्ट्री आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. इशान किशन कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात मैदानात उतरला आहे. इशान किशन मैदानात उतरला आणि त्याने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. बुची बाबू स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याने शतक ठोकलं होतं. त्यानंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही त्याच्या फलंदाजीची चमक दिसली. 121 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 85.12 इतका होता. त्याच्या खेळीनंतर त्याने टीम इंडियाचं दार पुन्हा एकदा ठोठावलं आहे.