आजपासून श्रावणाला सुरुवात! यंदा किती श्रावणी सोमवार?कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ वाहायची?

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात श्रावण सोमवार, शुक्रवार आणि शनिवारच व्रत करण्यात येतं. महिला श्रावणातील दर मंगळवारी मंगळागौरीची पूजा करतात. महादेवाला समर्पित श्रावण महिन्याला ऑगस्टच्या नवीन आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते.

श्रावण सोमवारच्या तारखा

पहिला श्रावण सोमवार – 5 ऑगस्ट 2024

दुसरा श्रावण सोमवार – 12 ऑगस्ट 2024

तिसरा श्रावण सोमवार – 19 ऑगस्ट 2024

चौथा श्रावण सोमवार – 26 ऑगस्ट 2024

पाचवा श्रावण सोमवार – 2 सप्टेंबर 2024

कधी कोणती शिवामूठ वाहायची?

5 ऑगस्ट : तांदूळ

12 ऑगस्ट : तीळ

19 ऑगस्ट : मूग

26 ऑगस्ट : जव

2 सप्टेंबर : सातू