मराठी सिनेसृ्ष्टीची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे सोनाली कुलकर्णीने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दुबईमध्ये नवं घर खरेदी केले आहे. सोनालीने आपल्या नव्या घरामध्ये पती कुणाल बेनोडेकरसोबत दिवाळी पाडवा साजरा केला. सोनालीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या माध्यमातून सोनाली आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती सोशल मीडियावर तिच्या नव्या प्रोजेक्टसोबत आपल्या पर्सनल लाइफशीसंबंधित अपडेट्स आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच सोनालीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर नवे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोनालीने दुबईमध्ये नवं घर खरेदी केले आहे. या फोटोच्या माध्यमातून सोनालीने तिच्या नव्या आलिशान घराची झलक दाखवली आहे.
सोनाली कुलकर्णीने आपल्या दुबईतील नव्या घरामध्ये खास फोटोशूट केले आहे. सोनालीने चॉकलेटी रंगाची ट्रेडिशनल साडी नेसली आहे. केसात गजरा लावून सोनालीने गळ्यात ट्रेडिशनल ज्वेलरी घातली आहे. सोनालीने आपल्या नव्या घरातील फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. सोनालीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘पाडवा नवीन घरात.’ असं लिहित चाहत्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
दरम्यान, सोनाली कुलकर्णीने ७ मे २०२१ रोजी दुंबईमध्ये कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले. सोनाली कुलकर्णीचा नवरा कुणाल बेनोडेकर दुबईमध्ये मोठा बिझनेसमन आहे. सोनाली पतीसोबत कधी दुबईमध्ये तर कधी मुंबईमध्ये राहते. हे दोघेही प्रत्येक सण दुबईमध्ये एकत्र साजरे करतात. याचे फोटो सोनाली आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते.