Assembly Election Video : विधानसभा निवडणूक आणि निकालाची तारीख ठरली, एकाच टप्प्यात निवडणूक

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली 14 जणांचे पथक गुरुवारी मुंबईत आले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा पथकाकडून घेण्यात येतो आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 15 ते 17 नोव्हेंबर मतदान तर 20 नोव्हेंबरला निकाल असेल, अशी शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांशी देखील संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून निवडणूक एकाच टप्प्यात घेण्याची मागणी करण्यात आली आहे.महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये होईल आणि पुढील 10 ते 15 दिवसांत आचारसंहिता लागू होण्याचा अंदाज राजकीय पक्षाचे नेते व्यक्त करत होते. तो अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे.नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होणार हे गृहीत धरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. भाजप पितृपक्ष संपताच आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करेल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.