सर्वसामान्यांना खिशाला आणखी झळ बसणार! घर बांधणे महागले, सळईंच्या किंंमतीत मोठी वाढ

स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आजच्या काळात घर घेणे तितकेसे सोपे नाही.विशेष म्हणजे अनेकजण घर बांधण्याचे नियोजन करताना बांधकाम साहित्याच्या किमती कमी होण्याची वाट पाहत असतात. पावसाळी हंगामात देशभरात सळईच्या किमतींत मोठी घसरण झाली असताना, आता महिनाभरात त्यांचे दर पुन्हा झपाट्याने वाढले आहेत.सध्याच्या घडीला राजधानी दिल्ली ते गोव्याप्रर्यंत सळईचे भाव वाढले आहेत.

एवढेच नाही तर सिमेंट आणि विटांचे भाव देखील वाढले आहेत. यावर्षी देशभरात मुसळधार पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सळईच्या किंमती झपाट्याने घसरताना दिसल्या आहे. मात्र, ही घसरण महिनाभरच राहिली आहे. सध्याच्या घडीला घर बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सळईच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये अवघ्या एका महिन्यात सळईच्या किंमतीत 1500 ते 2000 रुपये प्रति टन वाढ झाली आहे. अर्थात आता सर्वसामान्यांना खिशाला आणखी झळ बसणार आहे.