Assembly Election : डबल धमाका! राहुल गांधी, नरेंद्र मोदी महाराष्ट्रात

विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई आणि विदर्भातील विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन करण्यासाठी आज (शनिवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.तर, हरियाणाच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर आज मतदान होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी देखील आज महाराष्ट्रात आले आहेत. राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकर्पण होणार आहे.

आचारसंहिता लागण्याच्याआधी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आज महाराष्ट्रात असल्याने आपल्या जाहीर कार्यक्रात ते काय बोलणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.राहुल गांधींचा (Rahul Gandhi ) आत्मविश्वास लोकसभा निवडणुकीनंतर वाढला आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा ते करत आहेत. आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात राहुल गांधी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर ते राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळाला भेट देणार आहेत.

तसेच दुपारी संविधान सन्मान संमेलनाला देखील ते उपस्थित राहणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात 56 हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन करणाऱ्या आहेत. विदर्भातील वाशिम तसेच मुंबई, ठाणे येथील प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईतील आपल्या दौऱ्यात पंतप्रधान भूमिगत मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत.आचारसंहिता लागण्याचीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या भाषणात महाराष्ट्रासाठी कोणत्या घोषणा करणार याची उत्सुकता असणार आहे.