मराठा आरक्षणावर महत्वाची अपडेट! पाहा कधी होणार निर्णय

आचारसंहितेआधीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेतला जाईल, असा निर्णय मराठा उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा उपसमितीच्या बैठकी हा अत्यंत मोठा निर्णय झाला आहे.त्यामुळे लवकरच मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल अशी अशा वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहायला लागले आहेत. थोड्याच दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशातच आता आचारसंहिता लागू होण्याआधीच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल असं मराठा उपसमितीच्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्वाची बैठक पार पडली आहे.सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्वाची बैठक पार पडली आहे.

या बैठकीला चंद्रकांत पाटील, मंत्री शंभुराज देसाई, प्रताप लाड, प्रविण दरेकर यांची उपस्थिती होती. या बैठकीत प्रामुख्याने क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील महामंडळ सुरू करावे ही मागणी केली होती, त्यावर सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. तर ओबीसीमधून आरक्षण मिळेपर्यंत ईडब्लुएस आरक्षण लागू करावे, आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशा विविध मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय होईल, असा महत्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.