मंगळवेढा पाठोपाठ सोलापूर येथे झालेल्या फडणवीस यांच्या कार्यक्रमाकडे भाजप विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी दांडी मारत आपण भाजपला जवळपास रामराम केला आहे याचे संकेत दिले आहेत.काही दिवसांपूर्वी अकलूज येथे झालेल्या कार्यक्रमात पवारांच्या स्टेजवर जाऊन रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी आपण जिल्ह्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहे असे वक्तव्य केल्याने मोहिते पाटील हे शरद पवार यांच्याकडे जाणार हे जवळपास निश्चित मानले जात होते.
रणजीत सिंह मोहिते पाटील यांना माढ्यातून शरद पवार उमेदवारी देतील असा विश्वास मोहिते पाटील समर्थकांना आहे. त्यामुळे रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी भाजपशी आणि फडणवीस यांची असणारे संबंध सध्या उघडपणे तोडल्याचे दिसत आहे.