थंडीत टाचांच्या भेगांमुळे त्रस्त आहात तर मग आजच करा हे घरगुती उपाय

आता सगळीकडेच थंडीचे वातावरण आहे आणि या थंडीच्या वातावरणामध्ये अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो. या थंडीच्या दिवसांमध्ये पाय, हात खूपच फुटतात.हिवाळ्यात अनेकांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

हवामानाव्यतिरिक्त शरीरात पोषक घटक नसल्यामुळे देखील टाचांना तडे जाण्याची शक्यता जास्त असते.टाचांना भेगा पडल्यामुळे अनेक वेळा तीव्र वेदना होतात, इतकेच नव्हे तर काही प्रकरणामध्ये टाचांचे तडे इतके वाढतात की त्यामुळे गंभीर जखम देखील होते, आणि त्यामधून रक्त वाहू लागते.

आशावेळी विविध औषधांचा वापर केला जातो, तुम्ही यासाठी काही घरगुती उपयांचा देखील वापर करू शकता. टाच फुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात असलेल्या काही गोष्टींचा वापर देखील करू शकता. ज्यांच्या मदतीने तुम्ही भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवू शकता.

लिंबू, ग्लिसरीन आणि गुलाब पाणी

भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लिंबू, ग्लिसरीन आणि गुलाबपाणी यांचे एकत्र मिश्रण करून वापरू शकता. यासाठी बादलीत कोमट पाणी घ्या. नंतर त्यात लिंबाचा रस, एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाबजल घाला. यानंतर, आपले पाय त्यात बुडवून ठेवा. आता पायाच्या स्क्रबच्या मदतीने टाच स्क्रब करा. यानंतर एक चमचा ग्लिसरीन, एक चमचा गुलाबजल आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून टाचांवर लावा.

मध

एक बादली पाण्यात मध मिसळा. मग त्यात पाय बुडवा. आणि फुट स्क्रबने स्क्रब करा, स्क्रबिंग करून झाल्यानंतर कोमट पाण्याने आपले पाय धुवा. आठवड्याभरात परिणाम दिसून येइल.

खोबरेल तेल

नारळाचे तेल भेगा पडलेल्या टाचांपासून मुक्त होण्यासाठी मॉइश्चराईजर प्रमाणे काम करते. भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाने प्रभावित भागांवर मसाज करा. यानंतर मोजे घालून ठेवा. हे काम रात्री करा, जेणेकरून पायाला आराम मिळेल आणि सकाळी पाय धुवा.

कोरफड

भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचाही वापर करू शकता. यासाठी बादलीत कोमट पाणी घ्या. मग त्यात तुमची टाच बुडवा. काही वेळाने पाय पाण्यातून काढून त्यावर कोरफडीचे जेल लावा. यानंतर, मोजे घाला आणि कोरफडीचे जेल टाचांवर रात्रभर असेच राहू द्या. असे केल्याने या समस्येपासून लवकर आराम मिळेल.