रात्री उशिरा झोपण्याचे तोटे आणि उपाय

आजच्या काळात लोकं दिवसभर काम करून रात्री थोडे वेळ का होईना फोन वापरण्यासाठी काढतातच. पण फोन वापरता वापरता सकाळचे २-३ कधी वाजतात याचं भान रहात नाही . मग रात्री उशिरा झोपून दुसया दिवशी डोळ्यात अर्धी झोप घेऊन कामावर लोकं जातात. हे रात्री उशिरा झोपणं आपल्या जवळ खूप घटक आहे, त्याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने शरीरावर आणि मनावर नकारात्मक परिणाम होतो. उशिरा झोपल्याने सकाळी थकवा जाणवतो, एकाग्रता कमी होते आणि कामाची उत्पादकता घटते. झोपेची कमतरता हार्मोनल असंतुलन निर्माण करते ज्यामुळे वजन वाढ, केसगळती, त्वचेवर मुरुमं आणि अकाली वृद्धत्व दिसू शकतं. याशिवाय, उशिरापर्यंत जागल्याने हृदयविकार आणि डायबिटीजचा धोका वाढू शकतो.

उपाय

दररोज एकाच वेळी झोपणं आणि उठणं याची सवय लावा. झोपण्याआधी मोबाईल, लॅपटॉपचा वापर टाळा. संध्याकाळी कॅफिनयुक्त पेय कमी घ्या. हलका व्यायाम किंवा ध्यानधारणा झोप सुधारते. झोपेचं वातावरण शांत, अंधार आणि आरामदायी ठेवा. थोडक्यात, वेळेवर झोप ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. नियमित आणि पुरेशी झोप घेतल्यास शरीर ताजेतवाने राहते आणि मानसिक आरोग्यही सुधारतं.