नोकरीची सुवर्णसंधी! सुरु झाली आरोग्य विभागात मेगाभरती, असा करा थेट अर्ज

तुम्हीही नोकरीच्या शोधात आहे पण हवी तशी नोकरी मिळत नाही तर हि माहिती अवश्य वाचा . नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी  करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज. ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य विभागात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उशीर न करता आजच भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून रत्नागिरी जिल्हात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. तब्बल 73 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.

ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने केली जात आहे. आपल्याला आपले अर्ज हे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य विभाग, रत्नागिरी येथे पाठवावे लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने येथे शिक्षणाची अट ही पदानुसार आहे. वैद्यकीय अधिकारीपासून ते स्टाफ नर्स, एंट्री ऑपरेटर अशा विविध पदांसाठी भरती सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 डिसेंबर 2023 आहे. यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागतील. त्यानंतर जे कोणी अर्ज करेल त्याचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे देखील उमेदवाराने व्यवस्थित पाहणे आवश्यक आहे. अर्ज काळजीपूर्वक वाचा.

खालीलप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस एकून जागा 19, वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी एकून जागा 1, वैद्यकीय अधिकारी आयुष पुरूष एकून जागा 2, वैद्यकीय अधिकारी आयुष महिला एकून जागा 3, जिल्हा महामारी तज्ञ एकून जागा 1, रुग्णालय व्यवस्थापक एकून जागा 1, जिल्हा सल्लागार एकून जागा 1, जिल्हा कार्यक्रम समन्वयक एकून जागा 1, ऑडिओलॉजिस्ट एकून जागा 1, सीपीएचसी सल्लागार एकून जागा 1, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एकून जागा 1.

सुविधा व्यवस्थापक एकून जागा 1, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक एकून जागा 1, पोषणतज्ञ एकून जागा 1, फिजिओथेरपिस्ट एकून जागा 1, केस रजिस्ट्री सहाय्यक एकून जागा 1, स्टाफ नर्स एकू जागा 6, डेटा एंट्री ऑपरेटर एकून जागा 5, प्रोग्राम असिस्टंट एकून जागा 1 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुकांनी उशीर न करता लगेचच अर्ज करा आणि मिळवा नोकरी.