अल्पबचत योजनेत गुंतवणूक करायची इच्छा असेल तर कोणत्या योजनेत सर्वात चांगला परतावा मिळतो, ते अगोदर तपासा. गुंतवणूक करताना अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग निवडतात. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड योजनांमध्ये जोखीम आहे. त्यामुळे विना जोखीम अल्पबचत योजनांमध्ये चांगला परतावा मिळू शकतो. या योजनांवर आयकर अधिनियम, 1961 चे कलम 80सी अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत आयकर सवलत मिळते.
पोस्ट ऑफिस बचत खाते : पोस्ट कार्यालयात कोणीही स्वतंत्र अथवा संयुक्त बचत खाते उघडू शकते. हे खाते कमीतकमी 500 रुपये जमा करुन उघडता येते. कमाल रक्कमेची मर्यादा नाही. या खात्यावर वर्षाला 4 टक्क्यांचा परतावा मिळतो.
आवर्ती ठेव खातं : हे खातं 100 रुपये महिना जमा करून उघडता येते. कमीत कमी 10 रुपयांच्या पटीत रक्कम जमा करता येते. या आवर्ती ठेव योजनेत 6.7 टक्के व्याज मिळते.
महिना उत्पन्न योजना : या योजनेत कमीत कमी 1000 रुपये आणि 1,000 रुपयांच्या पटीत खाते उघडता येते. एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जमा करता येतात. या खात्यावर वार्षिक 7.4 टक्क्यांचा परतावा मिळतो.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना : या खात्यात कमीत कमी 1,000 रुपये आणि 1000 रुपयांच्या पटीत ठेव ठेवता येते. या खात्यात ज्येष्ठ नागरिक कमाल 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या खात्यावर वार्षिक 8.2 टक्के वार्षिक व्याज मिळते.
पब्लिक प्रोव्हिडंड फंड : एका आर्थिक वर्षात पीपीएफमध्ये कमीत कमी 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.एक वित्त वर्ष में पीपीएफ में मिनिमम 500 रुपए और अधिकतम 1.5 लाख रुपए तक निवेश किया जा सकता है. इस स्कीम में निवेशकों को 7.1 फीसदी का रिटर्न मिलता है.
सुकन्या समृद्धी खाते : एका आर्थिक वर्षात या योजनेत 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये (50 रुपयांच्या पटीत) एकरक्कमी वा अनेक हप्त्यात जमा करता येतात. या योजनेत गुंतवणूकदारांना 8.2 टक्के दराने रिटर्न मिळत आहे.