नॅशनल फर्टीलाइजर लिमिटेडने भरतीला सुरुवात केली आहे. विविध विभागातील रिक्त पदांसाठी या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजमेंट ट्रेनी या पदांच्या एकूण ३४९ जागा भरण्यात येणार आहेत. या साठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ९ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२४ आहे.अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जाहीर वेळोमर्यादेच्या आत उमेदवारांनी अर्ज नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन स्वरूपांत नोंदवता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी careers.nfl.co.in किंवा nationalfertilizers.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
पदाचे नाव –
१. नॉन एक्झिक्युटिव्ह – या पदासाठी एकूण ३३६ जागा भरायच्या आहेत.
२. मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी एकूण १३ जागा भरायच्या आहेत.
शैक्षणिक पात्रता –
१. नॉन एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी परीक्षा किमान ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित शाखेतील पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
२. मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी – CA/CMA or MBA (Finance) या शाखेमध्ये ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेले असावे.
वेतन –
१. नॉन – एक्झिक्युटिव्ह या पदासाठी सुरुवातीला दरमहा २१,५०० रुपये पगार देण्यात येईल. तो पुढे ५६,५०० रुपयांपर्यंत जाईल.
२. मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी सुरुवातीला दरमहा ४०,००० रुपये पगार देण्यात येईल. तो पुढे १, ००,००० रुपयांपर्यंत जाईल.
NFL च्या या भरतीमध्ये भाग घेण्यास इच्छुक उमेदवारांना नियुक्तीसाठी काही टप्प्यांना पात्र करणे अनिवार्य आहे. निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्प्यांचा समावेश आहे. निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारांना लेखी परीक्षा पात्र करावे लागणार आहे. दस्तऐवजांची पडताळणीचा यामध्ये समावेश आहे. तसेच उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला पत्र करावे लागणार आहे. या सर्व टप्प्यांना यशस्वीरीत्या पात्र करणाऱ्या उमेदवाराला नियुक्त करण्यात येणार आहे.