Diwali Skin Care: दिवाळीत चेहऱ्यावर Instant Glow हवाय? सीक्रेट तुमच्याच किचनमध्ये!

सणासुदीच्या काळात बरेच लोक पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार करून घेतात, पण तरीही काही वेळेस चेहऱ्यावर मुरुम, डाग दिसतात. त्यांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये रसायने असतात, ज्यामुळे त्वचेचे आणखी नुकसान होते. यासाठी तुम्ही घरगुती उपाय ट्राय करू शकता.स्वयंपाकघरात असलेले बेसन हे त्वचेसाठी चांगले मानले जाते. बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते. यामुळे चेहऱ्यावरील घाण आणि तेल साफ होते. बेसनाचा वापर केल्याने मुरुमे आणि डागही दूर होतात. याशिवाय त्वचेचा रंगही सुधारतो. तुम्ही ते अनेक गोष्टींमध्ये मिसळून वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या 3 गोष्टी तुम्ही मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता.

बेसन आणि दही – चेहऱ्यावर चमक येण्यासाठी बेसनामध्ये दही मिसळूनही लावता येते. यासाठी एका भांड्यात दोन चमचे बेसन घ्या आणि त्यात एक चमचा दही घाला.हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा फेसपॅक वापरल्याने चेहऱ्यावरील डाग निघून जातात.

बेसन आणि गुलाबपाणी – चमकदार त्वचेसाठी बेसनामध्ये गुलाबपाणीही घालता येते. यासाठी एका भांड्यात एक चमचा बेसनामध्ये एक चमचा गुलाबजल मिसळा.गरजेनुसार गुलाबपाणी टाकता येते. यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

बेसन आणि लिंबू – बेसनामध्ये लिंबाचा रस मिसळा आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या.मिश्रण सुकल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.