शरीराच्या ‘या’ अवयवांना अननस खाल्ल्याने मिळतात भरपूर फायदे

अननसात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, मॅंगनीज, पोटॅशियम, फोलेट आणि फायबरसह अनेक पोषक घटक असतात. म्हणूनच अननस आरोग्यासाठी वरदान मानलं जातं. मात्र हे फळ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खायला हवं. तरच त्याचा शरीराच्या दृष्टीने उपयोग होतो. आज आपण पाहू या, शरीराच्या नेमक्या कोणत्या अवयवांना अननस खाल्ल्याने फायदा होतो .

हृदय मजबूत करण्यासाठी

​हृदयाचं आरोग्य मजबूत करण्यासाठी अननस प्रभावी आहे. तुम्हाला गंभीर आणि जीवघेण्या हृदयरोगांचा धोका कमी करायचा असेल, तर तुम्ही पोषक तत्वांनी समृद्ध अननसाचं सेवन करायला सुरुवात करावी. हाडं मजबूत करण्यासाठी देखील हे फळ सेवन केलं जाऊ शकतं.

अननसात आढळणारे सर्व पोषक घटक आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पोटाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण अननसाचं सेवन करू शकतो. वजन कमी करण्याचा प्रवास सोपा करायचा असेल तर तुम्ही अननस तुमच्या आहार योजनेचा भाग बनवू शकता. अननस खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

अननसात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अननस खाण्याचा सल्ला दिला जातो. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे वारंवार आजारी पडत असाल तर तुम्ही पोषक तत्वांनी युक्त अननसाचे सेवन करायला सुरुवात करावी.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अननस हे यासाठी एक उत्तम फळ आहे. वजन कमी करण्यासाठी हे परिपूर्ण आहे कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्याव्यतिरिक्त, ते तुमची भूक नियंत्रित करण्यास आणि जास्त खाण्यापासून रोखण्यास देखील मदत करते.

शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून

उन्हामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते. अननसात पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास आणि उष्माघातापासून बचाव करण्यास मदत करते.