माजी मंत्री कै. पतंगराव कदम यांच्या आदेशाचे पालन करणारे कदम कुटुंबीयांचे स्नेही मनमंदिर उद्योग समूहाचे प्रमुख अशोक गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांना पत्रकार परिषदेत पाठिंबा जाहीर केला. कोणत्याही निवडणुकीत कदम यांचा निरोप आल्याशिवाय कोणाचीही बाजूंना न घेणारे अशोक भाऊ यांनी पाठिंबा जाहीर केल्याने विश्वजीत कदम यांचा सुहास बाबर यांना पाठिंबा आहे का? अशा चर्चांना वेग घेतला आहे.
विटे शहरात बाबर यांना पाठिंबा वाढू लागला आहे. नुकताच जय मल्टीपर्पज हॉल येथे माजी नगरसेवक धर्मेश भैया पाटील यांनी आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील यांच्या मध्यस्थीने शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून सुहास बाबर यांना विटा शहरात मताधिक्य देण्याचा निर्णय जाहीर केल्याने पूर्ण विट्यात खळबळ उडाली आहे. पाठोपाठच खानापूर घाटमाथ्याचे नेते सुहास नाना शिंदे यांच्या उपस्थितीत गायकवाड कुटुंबीयांनीही हा पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली. यापूर्वी निवडणूक जाहीर झाल्यापासून एकास एक उमेदवार उभारणे याबाबतच्या सर्व बैठका अशोकभाऊ गायकवाड यांच्या घरी होत होत्या. त्यामुळे एकूणच जो बदल झालेला आहे त्यामुळे बाबर समर्थकांच्यात उत्साह संचारला आहे.