२३ तारखेला विजय काय असतो हे विरोधकांना दाखवत गुलाल उधळू; प्रतीक पाटील 

बोरगाव येथे जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली. विरोधक मतदारांची संभ्रमावस्था निर्माण करून मते मिळवायचा केविलवाणा प्रयत्न अपयशी होणार आहे. उपरा उमेदवार जयंतरावांच्या विरोधात उभा करण्याची भाजपची ही कटू नीती कधीच यशस्वी होणार नसल्याचे मत राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगाव (ता. वाळवा) येथील मोहनराव पाटील हॉलमध्ये झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले प्रत्येकाच्या मनामनात रूजली तरच उच्चांकी मतांची आघाडी घेऊ.

तुतारीचे यश हीच तुमच्या आमच्या कामाची पोचपावती २३ तारखेला विरोधकांना द्यायची आहे. जयंतराव पाटील यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. वाळवा विधानसभेची जबाबदारी आपल्यावर आहे. ती समर्थपणे पेलत उच्चांकी मताचा इतिहास घडवायचा आहे. परिसरात जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून विकासाचा डोंगर उभा केला, यापुढे विकासाची गंगा अविरत वाहत राहील, असा विश्वास व्यक्त केला.