पंचांगानुसार, आज 15 नोव्हेंबर 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष
कोणत्याही गोष्टीची कार्यवाही करण्यासाठी बराच वेळ काढाल.
वृषभ
आज काही निर्णय भावनेवर आधारित राहतील. व्यवसायात खोलवर जाऊन विचार करण्याची परिस्थिती निर्माण होईल.
मिथुन
घरामध्ये जवळच्या सहलीचे बेत आखाल. खेळांमध्ये जास्त रमाल.
कर्क
महिला भावना अधिष्ठित निर्णय घेतील. आज ईश्वराचे पाठबळ मिळेल.
सिंह
आज तुमचे कर्तुत्व बहरेल. नोकरी-व्यवसायात नवीन विचारांचा जास्तीत जास्त अवलंब कराल.
कन्या
तुमच्यासोबत असणाऱ्या लोकांना तुमचे विचार पटणार नाहीत, शेवटी कुठेतरी तडजोड करावी लागेल.
तूळ
परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवा. जोडीदाराच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
वृश्चिक
महिलांना कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास संभवतात. काही नवीन योजना राबवाल.
धनु
आज ग्रहांची साथ चांगली मिळेल. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल.
मकर
शैक्षणिकदृष्ट्या संशोधन वृत्ती राहिल्यामुळे करिअरचा विचार चांगल्या पद्धतीने करता येईल.
कुंभ
शिक्षणासाठी दुसऱ्यांना मदतीचा हात द्याल. धार्मिक गोष्टींची आवड राहील.
मीन
विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे बेत ठरतील. लेखकांच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल.