राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीने महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर शहरात घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधला. जयंत पाटील यांनी महिलांचे आरोग्य, शिक्षण व रोजगाराची काळजी घेतली आहे. महिलांचा सन्मान व आदर केला आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहोत, असा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी महिलांनी दिला. जयंत पाटील यांच्या विक्रमी विजयात आम्ही महिला मोठे योगदान देऊ, असा विश्वास महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांनी व्यक्त केला.
