मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास होणार गुन्हा दाखल

लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा, यासाठी मतदानाला जाताना कोणालाही जवळ मोबाईल बाळगता येणार नाही. मोबाईल स्वत:जवळ ठेवून मतदान केले आणि त्यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला किंवा मोबाईलच्या स्टेट्‌सवर ठेवल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे.विधानसभा निवडणुकीवेळी असा प्रकार घडू नयेत म्हणून केंद्राध्यक्षांना तसे निर्देश देण्यात आले आहेत.